तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न   

सातारा, (प्रतिनिधी) : ठाकुरकी ता. फलटण येथे युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आले आहे. संदीप मनोहर रिटे (वय ३५, रा. ठाकुरकी, ता. फलटण) असे या युवकाचे नाव असून, डोक्यावर, गळ्यावर गंभीर जखमा व गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने फलटण व परिसरात खळबळ उडाली आहे.
 
फलटण येथील नाना-नानी पार्क विमानतळाशेजारी संदीप रिटे गेल्या महिनाभरापासून कामाला होते, तसेच संदीप यांच्या पत्नी सोनाली याही आठवड्यापासून तिथेच कामाला होत्या. संदीप हे मंगळवारी (१० जून) पत्नीस माहेरी सोडून कामाला गेले; परंतु सायंकाळी सात वाजले तरी घरी आले नाहीत. बुधवारी (११ जून) संदीप कामावर येणार का? अशी कामाच्या ठिकाणावरून संदीपच्या घरी विचारणा झाली. त्यावर घरातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, ते कोठेही न मिळाल्याने फलटण शहर पोलिस ठाण्यात संदीप यांची पत्नी व कुटुंबीयांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेले.
 
याचवेळी ठाकुरकी ता. फलटण गावच्या हद्दीत पंदारकीच्या शिवारात एक अनोळखी युवकाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फिर्यादी सोनाली, भाचा दीपक खुडे व वडील सुभाष घोलप यांनी ठाकुरकी हद्दीत जाऊन पाहिले असता सोनाली यांनी पती संदीप यांचा हा मृतदेह असल्याचे सांगितले. 

Related Articles